वैभववाडी प्रतिनिधी
नापणे गावठाणवाडी येथे मानव विकासच्या गाडीवर झाडाची फांदी पडल्यामुळे गाडीची दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यात गेले काही दिवस पावसाची संतत सुरु आहे. कणकवली आगारातून सकाळी ७. ३० सुटणारी कणकवली व्हाया नापणे – नावळे ही मानव विकास ची एस टी बस सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास नापणे गावठाणवाडी येथे पोहचली असता, या ठिकाणी रस्त्याच्या बाजूच्या झाडाची फांदी या एस टी बसच्या दर्शनी भागावर पडली. यामुळे एस टी च्या दर्शनी भागाची काच फुटल्यामुळे बसचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.










