महेश दाभोलकर समाजरत्न पुरस्कार 2025 ने सन्मानीत!           

मसुरे | झुंजार पेडणेकर       :    विश्वकर्मा सोशल वेलफेयर फौंडेशन पुणे आयोजित समाजभूषण सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२५ मध्ये सायकलिंग प्रशिक्षक, फिटनेस प्रचार प्रसारक व पर्यावरणाचे महत्व आदी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेश मिनाक्षी चंद्रकांत दाभोलकर यांना आदरणीय संत श्री वैश्वकर्मण धर्माधिकारी,विश्वधरण समर्थ सदगुरु महाराज, पीठाधीश्वर – परब्रम्हज्योती पीठ न्यास, उज्जैन, मध्यप्रदेश यांच्या शुभहस्ते विशेष राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यक्रम रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे संपन्न झाला.

विश्वस्त व संस्थापक सदस्य विवेकानंद सुतार, प्रकाश दिघे, दिलीप सुतार विश्वस्त सौ.संगिता सुतार, राजू बावरकर, सुभाष सूर्यवंशी, अध्यक्ष राजाराम दिवेकर, उपाध्यक्ष पांडुरंग सुतार, महिला अध्यक्षा अमृता देगावकर आदी मान्यवर ह्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

महेशच्या ह्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सुतार शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मेस्त्री, आनंद मेस्त्री, शैलेश मेस्त्री, पोलीस अधिकारी विजय मेस्त्री, गुरुनाथ मेस्त्री, शूटिंगबॉल आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, पत्रकार पपू पेडणेकर, राजन मेस्त्री आदी मान्यवरानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.