देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती व स्वच्छता अभियान संपन्न

देवरूख (प्रतिनिधी) :

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. यानंतर “एक दिन, एक घंटा, एक साथ राष्ट्र स्वच्छता” या अभियानाअंतर्गत “स्वच्छता ही सेवा” शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता उपक्रम राबवत परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला. विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. यामुळे त्यांच्या एकात्म मानवतावादाच्या विचारधारेची माहिती विद्यार्थ्यांना ज्ञात होऊन, समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित झाले. या उपक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.