पागाने मच्छिमारी करणाèया मच्छि माराचा खाडीच्या पाण्यात तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू
तांबळडेग खाडीमधील घटना
देवगड : प्रतिनिधी
तासभर मच्छिमारी करूनही मासळी न मिळाल्याने शेवटचे जाळे टाकून बघतो असे सांगून खाडीमध्ये जाळे टाकतानाच पाण्यात तोल जावून पडल्याने तांबळडेग मधलीवाडी येथील राजाराम सिताराम तारी(७५) यांचा मृत्यू झाला. मुलासमवेत नेहमी पागाने मच्छिमारी करणाèया वडीलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यु झाला ही घटना शुक्रवारी पहाटे २.३० वा.सुमारास तांबळडेग किरावन खाडी येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार तांबळडेग मधलीवाडी येथील राजाराम सिताराम तारी हे त्यांचा मुलगा रूपेश(४५) याच्यासमवेत बुधवारी पहाटे दीड वाजण्याचा सुमारास तांबळडेग किरावन खाडी येथे पागाने मच्छिमारीसाठी गेले होते.एक तास पागाने मच्छिमारी करून मासे मिळाले नाही म्हणून मुलाने घरी जावूया असे वडीलांना सांगीतले मात्र एकदा जाळे टाकून बघतो असे सांगून त्यांनी पाग हे जाळे पाण्यात टाकले दरम्यान त्यांचा त्यावेळी तोल जावून पाण्यात पडल्याने ते बुडाले.पहाटे अडीज वाजण्याचा सुमारास ही घटना घडली.तंचा मुलगा रूपेश यांना वडील पागाने मच्छिमारी करीत असलेल्या ठिकाणी दिसले नाही म्हणून त्यांनी आसपास पाहिले मात्र ते न दिसल्याने त्यांनी तात्काळ जवळच असलेल्या घरातील ग्रामस्थांना घडलेल्या घटनेबाबत जावून सांगीतले.यावेळी काका मुणगेकर आदी ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाऊस व अडचणीची वाट असल्याने शोधकार्यात अडथळे आल्यामुळे रात्री शोधमोहिम राबविता आली नाही.शुक्रवारी सकाळी तांबळडेग येथील स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थ मधुकर धावडे, गुरू कुबल, बाबा बांदकर, काका मुणगेकर, नंदू धुरी, सद्गुरू कुबल, अर्जुन सारंग आदींनी खाडीपात्रात शोधमोहिम राबविली.सकाळी ७.१५ वा.सुमारास राजाराम तारी यांचा मृतदेह खाडीच्या पाण्यात मिळाला.तारी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना असा परिवार असून गेली कित्येक वर्षे ते मच्छिमारी या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत होते.त्यांचा निधनाने तांबळडेग गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची खबर त्यांचा मुलगा रूपेश यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.












