उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख विलास पावसकर भाजपात
वेंगसरमधील उबाठाच्या दोन ग्रा. पं. सदस्यांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल
पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी येथील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख विलास पावसकर यांच्यासह वेंगसर गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये वेंगसरमधील दोन ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. वेंगसर गाव भाजपमय झाल्याने कोळपे जि.प. मधील उरलीसुरली उबाठा सेना नामशेष झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. ओरोस येथील भाजपा मुख्यालयात पक्षप्रवेश पार पडला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये वेंगसर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बेळेकर, वेंगसर उपशाखाप्रमुख विनायक बेळेकर, बुथप्रमुख आत्माराम गोठणकर, गटप्रमुख शांताराम खाडे, काशीराम खाडे, गटप्रमुख प्रमोद नार्वेकर, गटप्रमुख पंढरीनाथ घाडी, सीताराम कानकेकर, गटप्रमुख अनंत शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बॅंक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्या संध्या तेरसे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिगंबर पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













