रामपूर मार्गताम्हाणे दुर्गा देवी विसर्जन सोहळ्याने नवरात्र उत्सवाची सांगता

चिपळूण (वार्ताहर) : रामपूर, मार्गताम्हाणे परिसरात रामपूर, कात्रोळी कुंभारवाडी, चिवेली फाटा, घोणसरे, मार्गताम्हाणे पद्मावती देवी जवळ नवरात्र उत्सवानिमित्त अत्यंत आकर्षक दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापना झाल्या. दररोज दांडिया, गरबा, महाआरती, भजन, हरिपाठ, कीर्तन, जाखडी नृत्य, वेगवेगळ्या स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, लावणी कार्यक्रम होऊन शुक्रवार दि. ३ रोजी वाजतगाजत फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीने दुर्गादेवी मूर्तींच्या विसर्जनाचा सोहळा झाला. नवरात्र उत्सवाची सांगता झाली.