मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा यांच्या वतीने गुरुद्वादशी उत्सवा निमित्त मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे १८ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८.०० ते ११.०० वा. दत्तगुरूंचा पुजाविधी व अभिषेक,दुपारी १२.०० वा. महाआरती,दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद,सायं. ७.०० ते ९.०० वा. स्थानिक भजने,रात्रौ ठीक ९.३० वा.दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ, सिंधुदुर्ग यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग “वेसरोत्पत्ती” आदी कार्यक्रम होणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा स्थानिक व मुबंई मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.













