दुरवस्था झालेल्या पुलाच्या पुनर्बांधणी संदर्भात घेतला आढावा. 
चौके – प्रतिनिधी:- शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सूचनेनुसार तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या मागणी वरून बुधवार दिनांक १५ रोजी मालवण गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता एस. एन. सावर्डेकर, शाखा अभियंता प्रकाश कात्रे, नितीन पोवार, विस्तार अधिकारी विनायक जाधव, सुरज बांगर या अधिकाऱ्यांनी काळसे, गोसावीवाडीला जोडणाऱ्या दुरवस्था झालेल्या पुलाची पाहणी करून पुलाच्या पुनर्बांधणी संदर्भात आढावा घेतला यावेळी शिवसेना कार्यकर्ते तथा माजी पंचायत सभापती राजेंद्र परब, काळसे माजी सरपंच रंगनाथ आजगावकर हे सुद्धा उपस्थित होते.
गोसावी वाडीतील रहिवाशांची गेली अनेक वर्षे सदर पूल रुंदीकरणासहित पुनर्बांधणीची मागणी असून याविषयी वारंवार प्रशासनाकडे व राजकीय नेत्यांकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर आज अधिकाऱ्यांनी गोसावी वाडीतील कमकुवत झालेल्या पुलाची पाहणी केली.











