ओटवणे (प्रतिनिधी) ओटवणे गावठणवाडी येथील चौगुले मित्रमंडळ आयोजित दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भव्य अशी नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा ओटवणे दशक्रोशी मर्यादित राहणार आहे.१९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धा होईल
ही नरकासुर स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असनिये, चराठा, कारीवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादीत असेल. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००२/- रूपये (श्री. बबलू गावकर पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक: ५००२/- रुपये (श्री. उमेश गावकर पुरस्कृत), तृतीय पारितोषिक ३००२/- रुपये (श्री.महेश गावकर पुरस्कृत), तसेच उत्तेजनार्थ १००२ रुपयांची तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
इच्छुक स्पर्धकांनी शनिवार १८ ऑक्टोबरपर्यंत उदीत गावकर ९०७५५ ७४६५८ आणि प्रथमेश गावकर ७५८८८६३११० यांच्याकडे आपली नावे द्यावीत असे आवाहन चौगुलेवाडी मित्रमंडळाचे बबलू गावकर आणि महेश गावकर यांनी केले आहे.










