सर्प मित्र यश पवार, सम्यक पवार यांच्या प्रयत्नाने शहरात सापडलेले अजगर सुरक्षीत आवासात

मंडणगड :प्रतिनिधी – मंडणगड येथील महावितरणचे कर्मचारी धीरज कदम राहणार धुत्रोली यांना 14 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात भला मोठा अजगर दिसून आला. त्यानंतर धीरज कदम यांनी हि बाब गावातील आपले सर्पमित्र यश पवार व सम्यक पवार यांस सांगीतले. त्यांनी आपल्या तरुण मित्रांच्या समवेत घटनास्थळी येऊन अजगरास पकडले व त्यास त्याच्या नैसर्गीक आवासात सुरक्षीत स्थळी नेऊन सोडले. सर्पमित्र यश पवार, सम्यक पवार, धीरज कदम यांनी पर्यावरण रक्षणाच्या प्रति केलेल्या कार्याचे तालुक्यातून कौतूक होत आहे.