त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची ३१ रोजी बैठक

 नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे हिंदी शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे हिंदी महामंडळ माजी अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांचे आवाहन
चिपळूण (वार्ताहर) : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र निश्चित धोरण करण्याकरिता समिती विभागीय भेटी देत आहे. भाषातज्ञ विचारवंत, राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, प्राथमिक- माध्यमिक शिक्षक संघटना यांचे पदाधिकारी यांच्याबरोबर संवाद साधून त्रिभाषा सूत्र नियोजनाबाबत ३१ ऑक्टरोबर रोजी सकाळी ९.३० वाजता नियोजन कार्यालय सभागृह, जिल्हाधिकारी रत्नागिरी येथे उपस्थित राहावे. सर्व हिंदी भाषा शिकविणारे प्राध्यापक, तालुका, जिल्हा हिंदी शिक्षक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून आपले मत मांडावे. त्रिभाषा सूत्राचा नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिफारस करावी. यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे माजी अध्यक्ष सल्लागार, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, जेष्ठ पत्रकार अनिलकुमार जोशी यांनी आवाहन केले आहे.