रत्नागिरी : प्रतिनिधी
दक्षता जनजागृती सप्ताह 2025 च्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या रत्नागिरी विभागाकडून दि.27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 28 ऑक्टोबर रोजी शासकीय नर्सिंग कॉलेज, सिव्हील हॉस्पीटल, रत्त्नागिरी, येथे दक्षता जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. सभेकरीता 100 ते 110 विदयार्थी व अध्यापक वर्ग हजर होते. सदर वेळी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत सविस्तर माहिती देवुन त्त्याबाबत मार्गदर्शन करुन उपस्थितांना हँडबीलचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील देखरुख परिसरातील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, सह दुय्यम निबंधक कर्यालय, तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय अशा शासकीय कार्यालय, बस स्थानके, रिक्षा स्टेंड येथील नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहिती देवुन उपस्थितांना पत्रके वाटली. मोक्याच्या ठिकाणी भिंतीपत्रके लावुन जनजागृती करण्यात आली.तसेच रत्नागिरी शहर परिसरातील पोस्ट ऑफीस येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत बैठक आयोजित करुन उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग यांना भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत सविस्तर माहिती देवुन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सभेकता सुमारे 90 ते 100 कर्मचारी उपस्थित होते त्यांना हँडबीलाचे वाटप करण्यात आले.स्थानिक वृत्तपत्र, केबल टिव्ही व आकाशवाणी व्दारे भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करण्यात आले. तसेच सोशल मिडीयाव्दारे व्हॉटसअप ग्रुपवर भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करुन तक्रारीकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचेकडील फोन नं. 02352 222893 आणि टोल फ्री क्रमांक 1064 या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाचे पोलिस उप अधिक्षक अविनाश पाटील, मो. क्र. 7588941247 , पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव मो. क्र. 9870474535, पोलिस निरीक्षक सुहास रोकडे, मो. क्र. 9067035910 यांच्याशी किंवा टोल फ्रि क्र. 1064 वर संपर्क साधावा.
Home महत्वाच्या बातम्या दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन











