मालवण नगरपालिकेकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम  

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात मोकाट जनावरे प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, मालवण नगरपालिकेने शुक्रवारी शहरातील मोकाट गुरे पकडण्याची मोहीम राबवली. या मोहिमेत 12 जनावरे पकडण्यात आली असून कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत.

 

संबंधित जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना नोटीस देऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अन्यथा नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. मात्र मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम यापुढे सुरु राहील अशी माहिती देण्यात आली आहे.