देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन आणि फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्या वतीने मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत मोफत जनरल मेडिसिन व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे मार्गदर्शन कन्सल्टंट फिजिशियन डॉ. महादेव पोकळे, एम.डी. (मेडिसिन) करतील.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार, किडनी व लिव्हरचे विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येईल. शिबिरादरम्यान खालील तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत —
BSL R (ब्लड शुगर), HbA1C, हिमोग्लोबिन (HB), कोलेस्ट्रॉल, ईसीजी आणि पीएफटी (फुफ्फुस कार्य तपासणी).
तसेच नॅब आय हॉस्पिटल, देवगड यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिरही होणार आहे. ज्यांना चष्म्याची गरज आहे अशांना ५०% सवलतीत चष्मे मिळतील. तर कॅटॅरॅक्ट (मोतीबिंदू) शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर चारिटेबल दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
देवगड मेडिकल फाउंडेशन व डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. चे डायरेक्टर डॉ. सुनील आठवले आणि फ्रेंड्स सर्कल, देवगड यांच्यावतीने श्री. सुमित कुबल यांनी नागरिकांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
ठिकाण: देवगड मेडिकल फाउंडेशन, एसबीआय समोर, तालुका देवगड, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१३
संपर्क: ७३८२८२१००० / ७३८२८२२०००









