आचरा–अर्जुन बापर्डेकर,
आचरा येथे रविवार दुपार पासूनच तुलसी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे.
हिर्लेवाडी येथे तुलसी विवाहासाठी तुळशीवृंदावन नववधू प्रमाणे थाटात सजविण्यात आली होती.
प्रत्येक सण उत्सवात विघ्न आणणा-या पावसाने रविवारी उसंत घेतल्याने तुलसी विवाहाचा सोहळा मोठया थाटात साजरा केला जात होता.
. आचरे गावात रविवार पासूनच तुळसी विवाहास सुरुवात झाली होती. सतत पडणार -या पावसामुळे या वेळी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करण्यास वेळ मिळत नव्हता. मात्र शनिवार पासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर तर काहींनी पावसावर मात करत छत्री घेऊनही तुळशी रंगरंगोटी करून सजविण्यात आल्या होत्या.
आचरा हिर्लेवाडी भागात तुळशी वृंदावन नववधू सारखे सजविण्यात आले होते. हिर्ले वाडी येथील शोभा पेडणेकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
आचरा देवूळवाडी येथे ही विवाह सोहळा मोठया उत्साहात सुरु असल्याचे दिसून येत होते. रामेश्वर मंदिर येथेही रात्री तुलसी विवाह सोहळा संस्थानी थाटात उत्साहात संपन्न झाला.
कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस हा सोहळा असतो. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत तुळशी विवाह घरोघरी केले जातात.













