एकूण ६ हजार १४३ मतदार, पुरूष ३ हजार ९२४ तर महिला ४ हजार २१९
महिला मतदार ठरविणार कोण होणार नगराध्यक्ष आणि नरसेवक
राजापूर (प्रतिनिधी): येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासनाकडून राजापूर नगर परिषदेच्या दहा प्रभागांतील अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या निवडणूकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे. त्यामुळे संपुर्ण शहरासह प्रभागांतील महिला मतदारांची संख्या हीच शहराचा नगराध्यक्ष व आपल्या प्रभागांतील नगरसेवक ठरविणार आहेत एवढे मात्र निश्चित.
राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिध्दी असा कार्यक्रम प्रशासनाकडून घेण्यात आला. ३१ ऑक्टोबर रोजी राजापूर शहरातील दहा प्रभागांतील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या निवडणूकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरूष मतदार यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ६० इतके मतदार हे प्रभाग क्रमांक सहा मध्ये असून सर्वात कमी मतदार हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये ५९६ इतके आहेत.
यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये एकूण ९०० मतदार असून ४३८ पुरूष तर ४६२ महिला, प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकूण ७५५ मतदार असून ३६२ पुरूष ३९३ महिला, प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात कमी म्हणजे एकूण ५९६ मतदार असून यामध्ये २८९ पुरूष तर ३०७ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये एकूण ७५६ मतदार असून यामध्ये पुरूष ३६८ तर महिला ३८८, प्रभाग क्रमाक पाच मध्ये एकूण ७५९ मतदार असून यामध्ये ३६७ पुरूष तर महिला ३९२ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वाधिक १०६० इतके मतदार असून यामध्ये पुरूष ४८६ तर ५७४ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक सात मध्ये एकूण ९२६ इतके मतदार असून यामध्ये ४४३ पुरूष तर ४८३ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक आठ मध्ये एकूण ६८३ इतके मतदार असून यात ३४५ पुरूष तर ३३८ महिला मतदार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एकूण ९२३ मतदार असून यामध्ये ४५२ पुरूष व ४७१ महिला मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये एकूण ७८५ मतदार असून यामध्ये ३७४ पुरूष व ४११ महिला मतदारांचा समावेश आहे.











