आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून निधी आहे मंजूर
शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर तसेच मुख्य मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु होणार आहे. दोन दिवसात मालवण कसाल व अन्य खड्डेमय रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरवात होणार आहे. अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी दिली आहे.
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून शासनस्तरावरून निधी मंजूर झाला आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे काम सुरु होताना अडचणी होत्या. दरम्याच्या काळात वर्क ऑर्डर व अन्य तांत्रिक प्रक्रिया पुर्ण करण्यात येत होती. आता दोन दिवसात खड्डे बुजवणे कामास सुरवात होणार आहे. डांबरीकरण प्रक्रिया पुर्ण करून रस्ते खड्डेमुक्त केले जाणार आहेत. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून हे काम पुर्ण होणार असल्याची माहिती दिपक पाटकर यांनी दिली.










