आ. सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांना यश — सांगलीच्या ईश्वरपूर शहरात आनंदोत्सवाचा माहोल!
मित्र पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके, पेढे, वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करत आ. सदाभाऊ खोत यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ईश्वरपूर असा पहिला उल्लेख एका जाहीर सभेत केल्यानंतर या नामांतराच्या मागणीला वेग आला होता. नगरपालिकेच्या सभागृहातही “इस्लामपूरचे ईश्वरपूर” असे नामांतर करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर झाला होता.
पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत ही मागणी मांडली होती.
आमदार गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत देवाभाऊंच्या सरकारने ती मागणी आज मान्य केली आहे.
यावेळी रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून “ईश्वरपूर” या नव्या नावाचा उत्सव साजरा केला.











