रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राज्य मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (1) डॉ. निपुण विनायक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्वयंवर सांस्कृतिक भवन, रत्नागिरी येथे यशस्वीपणे पार पडली. कार्यशाळेचे उदघाट्न उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी सादर केले.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग श्री. कैलास साळुंके, उपसंचालक, कोल्हापूर मंडळ डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, पुणे डॉ. योगेश साळे, कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई श्री. निलेश ठाकूर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, सहसंचालक, आय.ई.सी. ब्युरो, पुणे डॉ. संजय जठार,
मनसोपचार तज्ञ डॉ. शास्वत शेरे, सल्लागार- सार्वजनिक आरोग्य विभाग श्रीमती अनेरी चव्हाण व श्रीमती मैत्रेई रेडकर,
सहायक संचालक (आ.कु.क.) पुणे श्री. अमोद गडीकर,
सहायक संचालक (कुष्ठरोग ) पुणे डॉ. अशोक रणदिवे,
वैद्यकीय अधिकारी- आ.मा.जि.आ. पुणे डॉ. सुनील चिद्राबार,
सहाय्यक संचालक (परिवहन) पुणे श्री. कैलास कराळे,
सहायक संचालक (हिवताप) पुणे डॉ. रणवीर,
मुख्य वैज्ञानिक अधिकारी-राज्य आरोग्य प्रयोगशाळा आर. पी. डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर तर, दुपारच्या सत्रात मानसिक आरोग्य सेवा विषयावर सखोल चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी सचिव डॉ. निपुण विनायक यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तसेच आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचे गट तयार करून त्यांच्याशी संवाद साधून कामाबद्दल अडचणी जाणून घेतल्या आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक दिशानिर्देशन व मार्गदर्शन केले. शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि अनुभवांची देवाणघेवाण होण्यासाठी सदर चर्चा सत्रे घेण्यात आली.
मानसोपचार तज्ञ् डॉ शास्वत शेरे यांनी मानसिक आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करून समाजात जागरूकता वाढविण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.मानसिक आरोग्याच्या बाबतीत त्यांनी तयार केलेला प्रोजेक्ट आमलात आणला तर तो समाजासाठी नक्कीच उपयोगी पडेल व या बाबत संगणकीय सादरीकरण केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी श्रीमती वैदेही रानडे यांनी मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा किती महत्वाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले व चांगल्या सेवा देण्यासाठी रोल मॉडेल म्हणून रत्नागिरी जिल्हा हा या बाबतीत नक्कीच राज्यात अग्रस्थानी असेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. दिलीप माने, डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि डॉ. भास्कर जगताप यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ संघमित्रा फुले यांनी उपस्थितांचे आभार म्हणून कार्यक्रमांची सांगता केली












