प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे स्थानिक वंचित रहाण्याची भिती
स्थानिकांवर अन्याय झाल्यास भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल
राजापूर | प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर डीएड, बीएड उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मात्र ही नियुक्ती करताना तालुका पातळीवर स्थानिक उमेदवारांचाच प्राधान्याने विचार व्हावा व त्यांना नियुक्ती मिळावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे यामध्ये पात्र असलेले अनेक स्थानिक शिक्षक वंचित रहाण्याची भितीही गुरव यांनी व्यक्त केली आहे.
यामध्ये अनेक स्थानिक शिक्षकांना आपले रहिवाशी दाखले हे १४ ऑक्टोबर पर्यंत देता आलेले नाहीत,परंतु 14 ऑक्टोबर नंतर ज्यांनी आपले रहिवाशी दाखले दिले असतील तर त्यांचाही यासाठी विचार केला जावा अन्यथा शिक्षण विभागाने या आडमुठे धोरण अवलंबिले व स्थानिकांवर अन्याय झाला तर मात्र भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा ईशारा गुरव यांनी दिला आहे.
राजापूर तालुक्यामध्ये 110 कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये 176 अर्ज दाखल झाले त्यापैकी डिऍड साठी 89 जागा रिक्त होत्या शासनाच्या आडमोटी धोरणामुळे फक्त 65 पात्र ठरले 24 जागा रिक्त राहिल्या आहेत आणि पदवीधर 53 अर्ज आले 32 जागा होत्या त्यापैकी 29 पात्र ठरले. बाकीचं सर्व तहसीलदारांचा रहिवासी दाखला उशिरा केल्यामुळे अपात्र ठरले आहे म्हणूनच रहिवाशी दाखल्याची 14 तारीख ची अटीला मुदतवाढ देणे गरजेचे आहे असे गुरव यांनी नमुद केले आहे.
दुसरा मुद्दा असा आहे ज्या शाळेमध्ये दहा व दहापेक्षा कमीपट संख्या आहे अशा शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एक शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंबून करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा व समुपदेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळेचे नुकसान होणार नाही व त्यांना ही जादा शिक्षक मिळतील असेही गुरव यांनी नमुद केले.
या प्रक्रियेत कंत्राटी शिक्षक म्हणून स्थानिक डिएड, बीएड पदवीधारकाला संधी मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे पात्र स्थानिक उमेदवार वंचित रहाण्याची भिती गुरव यांनी व्यक्त केली आहे.
यासाठी रहिवाशी दाखला देण्याची मुदत ही १४ ऑक्टोबर देण्यात आली होती. मात्र त्यामध्येही दोन ते तीन दिवस सुट्टी असल्याने व निवडणूकीच्या गडबडीत अनेकांना दाखले मिळण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे स्थानिक असूनही रहीवाशी दाखला वेळेत न दिल्याने त्यांची संधी हुकण्याचा धोका आहे. यासाठी प्रशासनाने नियमावर काटेकोर बोट न ठेवता ज्यांनी रहीवाशी दाखले दिले आहेत, जे यासाठी पात्र ठरत आहेत अशा स्थानिक उमेदवारांना नियुक्ती द्यावी नव्हे दिलीच पाहिजे अशी मागणी गुरव यांनी केली आहे.
आज अनेक शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत, काही शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यातून, रिक्त पदांचा प्रश्न गंभीर होवून पालकांमधून रिक्त शिक्षकपदांबाबत नाराजीचे सूर आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणीही सुरू झाली. इच्छुकांकडून अर्ज स्वीकारणे, हरकती मागवणे या प्रक्रियेला विलंब झाला. त्यामध्ये विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यातून, रखडलेली नियुक्ती प्रक्रीया आता पुन्हा सुरू झाली आहे. कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये स्थानिक डिएड, बीएडधारकांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. याबाबत आपण वारंवार जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आधिकाऱ्यांना दुरध्वनी करूनही त्यांच्याकडून तो उचलला जात नाही. अशा प्रकारे जर शिक्षण विभाग मनमानी कारभार करणार असेल तर आंम्ही गप्प बसणार नाही असा ईशाराही गुरव यांनी दिला आहे.
राजापूर तालुक्यात आज अनेक स्थानिक युवक बेरोजगार आहेत, त्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी आंम्ही प्रयत्न करत आहोतच, पण प्रशासनाने देखील यात मोलाचे असे सहकार्य करणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेत १०० टक्के स्थानिक उमेदवारांनाच संधी मिळाली पाहीजे तसे झाले नाही, प्रशासनाने मनमानी केली तर मात्र आंम्ही गप्प बसणार नाही प्रसंगी स्थानिक बेरोजगारांसाठी रस्त्यावर उतरू असा ईशारा गुरव यांनी दिला आहे.












