नगराध्यक्ष पदासाठी ६ तर २० नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवार रिंगणात….
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष एका मेका समोर उभे ठाकले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या तीन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ६ तर २० नगरसेवक पदासाठी आता ८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक २ डिसेंबर रोजी पार पडत आहे. या पाश्र्वभूमीवर प्रभाग क्र. ४ ब मधील नामदेव प्रकाश वारंग व नरेंद्र गुरूनाथ नाईक तर प्रभाग क्र. ६ ब मधील उपेंद्र सुभाष तोटकेकर या तिन्ही अपक्ष उमेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ८३ उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष लढत होणार आहे.












