मसुरे | झुंजार पेडणेकर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वायंगवडे ग्रामपंचायतीने 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्राम सभा यशस्वीरित्या पूर्ण करून अभियानामध्ये सहभाग नोंदविला. गावातील सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक विहिरी, स्मशान भूमी, मंदिरे, शाळा, अंगणवाडी इत्यादी परिसराची स्वच्छता लोकसहभाग व श्रमदानाच्या आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. ग्रामसभेला 165 ग्रामसभा सदस्य उपस्थित होते. ग्रामसभेच्या निर्णयानुसार गावातील ग्रामस्थांनी नुकतीच कसाल हेदुळ खोटले वायंगवडे कट्टा रस्त्याच्या वायंगवडे गावच्या हद्दीमध्ये दुतर्फा वाढलेली झाडे व गवत एकत्रित येऊन स्वच्छता केली. वायंगवडे गावातील सर्व ग्रामस्थांच्या एकजुटी बाबत व केलेल्या कामकाजा बाबत कौतुक होत आहे. सुमारे 3 किमी अंतर दोन्ही बाजूला ग्रास कटर च्या साह्याने व दोन्ही बाजूची झाडे तोडून वाहनांना होणारा अडथळा दूर केला. त्यावेळी वायंगवडे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ श्रमदानासाठी उपस्थित होते. त्यावेळी काही ग्रामस्थांनी नाष्टा चहा पान व काही ग्रामस्थांनी ग्रास कटर साठी लागणारे पेट्रोल ची व्यवस्था सुद्धा केली. त्यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांचे व देणगीदारांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानण्यात आले.












