भगव्या उत्साहात मालवण बाजारपेठेत शिवसेनेची प्रचार फेरी

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ; नागरिकांच्या घेतल्या भेटी

नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह शिवसेना नगरसेवक उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

प्रभाग सात व आठ मार्गांवरील प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : भगव्या उत्साहात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मालवण बाजारपेठ मार्गावर शनिवारी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती प्रचार फेरीत लाभली. उत्स्फूर्त अश्या प्रतिसादात प्रचार फेरी निघाली. शिवसेना नगराध्यक्ष उमेदवार सौ. ममता वराडकर यांसह सर्व शिवसेना नगरसेवक उमेदवारांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले..

भरड दत्त मंदिर येथे देवतांचे दर्शन घेऊन भरड मार्गांवरून मालवण बाजारपेठ व परिसर येथील प्रभाग सात व आठ येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मालवण बाजारपेठ येथून रॅली निघाली. आमदार निलेश राणे यांनी जनतेच्या भेटी घेतल्या. शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर, प्रभाग सात नगरसेवक उमेदवार नरेश हुले, नगरसेविका उमेदवार मेघा सावंत यासह प्रभाग आठ नगरसेवक उमेदवार राजन परुळेकर नगरसेविका उमेदवार शर्वरी पाटकर यांना बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदगावकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, काका कुडाळकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मोहन वराडकर, दिपक पाटकर, विश्वास गांवकर, अरविंद करलकर, किसन मांजरेकर, भाऊ चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, स्वप्नांली नेरुरकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका नैना मांजरेकर, नाना साईल, शेखर गाड, निषय पालेकर, अभय कदम, निकीत वराडकर, अखिलेश शिंदे, जाबीर खान, विनायक रेडकर यांसह शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकही यावेळी मोठया संख्येने या रॅलीत सहभागी झाले.

थेट संवाद ; उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार निलेश राणे यांनी दुकाने, घरे याठिकाणी भेट देत नागरिकांशी, व्यापारी वर्गाशी थेट संवाद साधला. नागरिकांनीही मोठया उत्साहात आ. निलेश राणे व शिवसेना उमेदवारांचे स्वागत केले.