परिसरात मुसळधार पाऊस
बांदा (प्रतिनिधी) :
बांदा परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. परिसरातील बहुतांश नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तेरेखोल नदीला पूर आला असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आळवाडा परिसरातील व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.अद्यापपर्यंत पुराचे पाणी नदीच्या बाहेर आलेले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तरीही पावसाचा रुद्रावतार पाहता धोका कायम आहे. शेर्ले येथील जुना कापई पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कापई भागातील ग्रामस्थही सतर्क झाले आहेत. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व सहकारी पोलीस कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.










