रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित IFP (International Film Project) Festival 2025 – Season 15 मधील 50 Hours Filmmaking Challenge या स्पर्धेत रत्नागिरीच्या The Last Table Studioने अभिमानास्पद यश मिळवले आहे. जगभरातील २३ देशांतील ३५० शहरांमधून आलेल्या ४०,००० हून अधिक फिल्म्समधून या स्टुडिओ निर्मित “डून्नू” या लघुपटाची Top 25 मध्ये निवड झाली आहे.
या विशेष स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांना दिलेल्या विषयावर केवळ ५० तासांत concept, script, casting, location, shooting, editing, lyrics, music—असे सर्व काम पूर्ण करून फिल्म सबमिट करावी लागते.
पुरस्कार सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
मुंबईतील प्रसिद्ध मेहबूब स्टुडिओ येथे २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेता अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, अनन्या पांडे तसेच दिग्दर्शक अनुराग बासू, अनुभव सिन्हा आणि रवी जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रतिष्ठित स्पर्धेत The Last Table Studioला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी Silver Medal ने सन्मानित करण्यात आले.
‘डून्नू’ टीमचे योगदान
* लेखन व दिग्दर्शन: सुमित मालप
* सह-दिग्दर्शन: मयूर दळी
* व्हिडिओ एडिटिंग: निखिल पाडावे व मयूर दळी
* छायाचित्रण: साईप्रसाद पिलणकर व सिद्धराज सावंत
* गीत: केतकी चैतन्य
* संगीत व गायन: ओंकार बंडबे
* Music Arranger: पंकज घाणेकर
* लाइन producer: ऋत्विक सनगरे
या निर्मितीसाठी Unbox चे श्री. गौरांग आगाशे व Nandai Digital Marketing चे धीरज पाटकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
कलाकार
फिल्ममध्ये विष्णू आशिष घाणेकर, गंधार तपन मलुष्टे, रियांश चेतन साखरपेकर, गणेश राऊत, सुनील बेंडखळे, शमिका घाणेकर आणि मयूर दळी यांनी भूमिका साकारल्या आहेत.
रत्नागिरीच्या The Last Table Studio च्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा आणि कोकण विभागाचा अभिमान वाढला आहे.












