लांजा : लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरू असून ११.३० वाजेपर्यंत ३२. ६० % मतदान झाले आहे. यात ४६४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत सुरळीतपणे मतदान झाले आहे. सकाळ सत्रात मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.
सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३२. ६० % टक्के इतके मतदान झाले असून ४६४० मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये २५५९ पुरुष व २०८१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सकाळी १० वाजेपर्यंत मतदारांची फारशी गर्दी मतदान केंद्रांवर दिसून आली नाही. त्यानंतर काही केंद्रांवर मतदारांची
गर्दी झाली होती. लांजा आगरवाडी मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान,सायंकाळपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.













