आरगाव येथे गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती सोहळा

लांजा :  तालुक्यातील आरगाव फौजदारवाडी येथे गुरुवार दिनांक ४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे
आरगाव येथील श्री गजानन बाबाराम खामकर यांच्या कुटुंबामार्फत व फौजदारवाडी विकास मंडळ यांच्या विद्यमानाने दरवर्षी श्री दत्तजयंती सोहळा आयोजित करण्यात येतो. उद्या गुरुवारी सकाळी
१०. वा. – श्री दत्त अभिषेक ,सायंकाळी ५ वाजता भजन, सायंकाळी ६.०५ मि. – श्री दत्त जन्मोत्सव ,
सायंकाळी ७ वाजता – दिंडी मिरवणूक व आरती,
रात्रौ ८ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरगाव फौजदारवाडी महिला मंडळ मेहनत घेत आहेत.