फोंडाघाट /कुमार नाडकर्णी– खरीप हंगाम संपताच आणि पिकांच्या साठवणी पर्यंतची सर्व कामे उरकल्यानंतर, वाडीवाडी वर निसर्गाच्या सानिध्यात,मौजमस्ती- चेष्टामस्करी- गमतीचे खेळ यासह शेतकरी कुटुंबासह सहभोजनाचा कार्यक्रम सुरू करतात.युवाई मित्र मंडळातर्फे, नुकताच गावचे आराध्य श्री पाचोबा देवस्थानाच्या निसर्गरम्य आणि शांत- शितल छायेत ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. देवस्थानच्या गणपती पूजन, शिळेवर पूजाअर्चा, आरती झाल्यानंतर परिसरातील भावीकानी अबालवृद्ध आणि स्त्री-पुरुषांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम नियोजनबद्ध आणि उत्साहात पार पाडण्यासाठी,आशिष रेवडेकर,सागर मरिये, ओंकार पिळणकर, आदित्य नेवरेकर, प्रथमेश कल्याणकर, राहुल शिंदे, उग्वेश सापळे,अक्षय जाधव, यश धुरी, मनूकुमार शेळके, ऋषिकेश ईश्वलकर, रोहन पावस्कर, हर्षल मांगले, प्रतीक काळगे यांनी सहकार्य केले. पुन्हा एकदा युवाई, पावित्र्य सांभाळून अध्यात्माकडे, पारंपारिक संस्कृतीकडे वळते आहे याचे परिसरात कौतुक होत आहे…










