रत्नागिरी:
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी छंदोत्सव 2025 अंतर्गत चा आज शुक्रवार चौथा दिवस, मागील तीस वर्षे अव्याहत सुरू असलेली” शामराव करंडक एकांकिका स्पर्धा” ही स्पर्धा खातू नाट्यमंदिर येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रंगमंचावर र. ए .सोसायटीचे कार्यवाह श्री.सतीश शेवडे , सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. आनंद देसाई , रत्नागिरीतील प्रथितयश उद्योजक आणि र . ए. एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व शामराव करंडक स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक श्री. राजनजी मलुष्टे , आजीव सभासद मंडळ अध्यक्ष श्री .महेश नाईक, आजीव सभासद डॉ . केतकर , उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी, पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर, छंदोत्सव प्रमुख श्री. मकरंद दामले व प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि नांदी म्हणून केले गेले . त्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. त्यानंतर पाच एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. ‘शब्द एक अविष्कार अनेक’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना ‘नातीगोती’ हा शब्द देण्यात आला होता. या एकांकिकांचे लेखन विद्यार्थी स्वतःच्या कल्पक व सर्वजणशील विचारातून करतात व नंतर यामध्ये वेगवेगळी पात्र यांचे रंगातदार अभिनयाने सादरीकरण रंग्माचावर करतात. या स्पर्धेत *बुरगुंडा , नात्याचे गणित, विरक्त, राजे आणि परित्राण* या एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या एकांकिकांचे परीक्षण रत्नागिरीतील श्रीरंग नाट्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. भाग्येश खरे आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, लेखक व अभिनेते श्री. प्रदीप तेंडुलकर यांनी केले. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत खातू नाट्यमंदिरामध्ये बहुसंख्या विद्याथ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया टोळ्ये यांनी केले.












