ओटवणे, विलवडे, सरमळे रस्ते पाण्याखाली ; ओटवणे नदीने गाठली धोक्याची पातळी

ओटवणे(प्रतिनीधी) मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ओटवणे नदी दुथडी भरुन वाहत असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओटवणे सोमा गावकर घरानजिक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून हिच परिस्थिति विलवडे मुख्य मार्गावर आहे वडानजिक ओहोळाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहत होते तर सरमळे सपथनाथ देवस्थानचा परीसर पाण्याखाली गेला. ओटवणे रवळनाथ मंदिर ते सोमा गावकर दुकान पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर कंभरेच्या वर पाणी आल्याने रस्ता बंद होता त्यातच पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे परिस्थिति नियंत्रणाच्या बाहेर आहे.