रामेश्वर कोलवाडी येथे विठ्ठल रखुमाई मंदिराचा बुधवारी वर्धापन दिन सोहळा

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : रामेश्वर कोलवाडी येथे श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २३ डिसेंबर पासून होणार आहे. २३ डिसेंबरला रात्री नऊ वाजता रेकॉर्ड डान्सचा कार्यक्रम सादर होईल. दरम्यान, २४ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता अभिषेक, दुपारी बारा वाजता महाप्रसाद, दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदीकुंकू आणि रात्री नऊ वाजता हनुमान प्रसादिक भजन मंडळ, कुडाळ येथील भजनी बुवा विजय उर्फ गुंडू सावंत आणि महादेश्वर प्रसादिक भजन मंडळ, नाडण, देवगड येथील बुवा संदीप पुजारे या दोन बुवांमध्ये डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विठ्ठलभक्तानी हजर राहावे असं आवाहन कोलवाडी ग्रामस्थ मंडळ (पुजारी आणि मंडळी) यांनी केले आहे.