शिपोशी गावात पार पडला भव्य वृक्षारोपण सोहळा

शिपोशी गाव परिसरात करण्यात आले दोन हजार वृक्षांचे वृक्षारोपण

शिपोशी ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचे आयोजन

संतोष कोत्रे | लांजा : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे चा संदेश देत तालुक्यातील शिपोशी गावामध्ये भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला. यामध्ये शिपोशी गाव परिसरात एकूण २००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
शिपोशी हितवर्धक मंडळ मुंबई , शिपोशी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सर्वच ठिकाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम ही बाब लक्षात घेता वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. हीच बाब लक्षात घेऊन शिपोशी येथे शिपोशी हितवर्धक मंडळ मुंबई, शिपोशी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त अशा सहभागातून शिपोशी गावात दोन हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्यासाठी शिपोशीचे मुंबईकर ग्रामस्थ, स्थानिक ग्रामस्थ उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यामध्ये विद्यार्थी वर्गाचा देखील सहभाग लक्षणीय होता.

या वृक्षारोपण सोहळ्यामध्ये शिपोशी सरपंच हरेश जाधव, उपसरपंच मारुती खामकर, ग्रामपंचायत सदस्य सारिका बाईंग ,अंगणवाडी सेविका शितल आमटे,ग्रामस्थ राजेंद्र शिंदे, बळीराम सावंत, राजेश सुर्वे ,शशिकांत खामकर, दीपक बाईंग, प्रसाद बाईंग, तेजस बाईंग, बाळकृष्ण खांदारे, महेश पितळे, वैजनाथ खामकर ,अनंत बाईंग, नंदकुमार घावरे, तेजस बाईंग, श्रीराम जाधव, गणेश बाईंग, सुधीर बाईंग, हितवर्धक मंडळ मुंबईचे चंद्रशेखर जाधव, सचिन तावडे ,यशवंत बाईंग, राजेश सुर्वे ,भाऊ कांबळे, यशवंत बाईंग ,विजय शिंदे, शांताराम कांबळे आदी उपस्थित होते.
दरम्यान पुढील वर्षी देखील अशाच प्रकारे गावात वृक्षरोपण सोहळा आयोजित केला जाईल आणि या केलेल्या वृक्षारोपण केलेल्या झाडांची योग्य प्रकारे देखभाल केली जाईल असा ठाम विश्वास देखील यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी नवचैतन्य युवा मंडळ बाईंग वाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.