चिपळूण (प्रतिनिधी):– राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री भाजपा नेते नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा चिपळूणतर्फे श्री वीरेश्वर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. त्यांच्या राजकीय वाटचालीस उत्तुंग यश प्राप्त होवो तसंच त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करण्यात आली.
यावेळी भाजपा महिला प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे ,माजी नगरसेवक परिमल भोसले, माजी युवक शहर अध्यक्ष संदीप भिसे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद कदम, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद सुर्वे, शहर उपाध्यक्ष महेश कांबळे, शहर उपाध्यक्ष निखिल रतावा ,एकनाथ सहस्रबुद्धे ,जिल्हा सरचिटणीस श्रद्धा कदम, विवेक गोखले, संदीप सुखदरे, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, भरत परब, अविनाश सावर्डेकर, महेश दीक्षित, सुधीर पानकर, शुभम खंडजोडे, अमेय सुर्वे, वेद सुर्वे, सपना ताई भिसे, साहिल भिसे, सुरेंद्र काका गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.











