सिंधुदुर्ग : माजी केंद्रीय मंत्री, खा.नारायण राणे नववर्षदिनी १ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. खा.नारायण राणे यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे १ जानेवारी-गुरुवारी दुपारी १२ वा.मुंबई जुहू निवासस्थान येथून प्रयाण , दुपारी १२:३० वा.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१)वर आगमन,१:२५ वा.मुंबई विमानतळ येथून विमानाने गोवा – मोपा विमानतळाकडे प्रयाण , दुपारी २:४० वा.मोपा विमानतळ येथे आगमन,दुपारी २:५० वा.सिंधुदुर्गकडे सावंतवाडी मार्गे कणकवलीकडे प्रयाण ,सायंकाळी ४:३० वा.ओम गणेश’ निवास्थान कणकवली येथे आगमन आणी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती असणार असल्याचे खा.नारायण राणे संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.












