तळवडे येथे ३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : तळवडे गावातील सुमारे ३१ लाख रुपये निधीच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये भवानी मंदिर ते मांजरेकर वाडी रस्ता (१४ लाख), भाऊचा धक्का ते बादेवाडी रोड (१० लाख) आणि भाऊचा धक्का ते लोकेवाडी रस्ता (७ लाख) अशा एकूण तीन कामांचा समावेश आहे.

या विकासकामांच्या भूमीपूजनप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, तळवडे शक्ति केंद्रप्रमुख शंकर सावंत, आंबोली मंडळ सरचिटणीस दादा परब उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य जगदीश मांजरेकर, मंगलदास पेडणेकर, नम्रता गावडे, विकास गावडे, सुशांत गावडे, प्रवीण लोके, बाळू साळगावकर, रामा गावडे, दाजी तुळसकर, सुदन मांजरेकर, पोलीस पाटील मयुरी राऊळ, झिला वेंगुर्लेकर, विनय काणेकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.