दिवा-सावंतवाडी गाडी आता १५ मिनिटे लवकर सुटणार

रत्नागिरी :
कोकणातील प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या दिवा-सावंतवाडी या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत मोठी अपडेट समोर आली असून १२ जानेवारीपासून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या या रेल्वे गाडीला दिवा व पनवेल स्थानकावर थांबा दिला जातो. सुधारित वेळापत्रकानुसार १०१०५ डाऊन दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस ही पूर्वीप्रमाणे सकाळी ६:२५ वाजता निघणार नसून, १० ते १५ मिनिटे आधी म्हणजे सकाळी ६ ते ६:१५ दरम्यान दिवा स्थानकातून सुटेल.
यामुळे प्रवाशांना पहाटेच दिवा जंक्शन रेल्वेस्थानकावर दाखल व्हावे लागणार आहे.