शिवापूर,वसोली, आंजिवडे,उपवडे, दुकानवाड गावात वाहतुकीचा पोचेना
नद्यांवरील पाण्याची पातळी कमी होत नसल्याने सर्वच झाले हवलदील
स्थानिक आमदार अपयशी ठरल्यानेच माणगाव -आंबेरी पुल अर्धवट राहिलेले
जनतेची सुरू आहेत हाल ,उपचारही मिळेनात,गाड्या गावात पोचेनात
माणगाव प्रतिनिधी-
सिंधुदुर्गात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात गेले पाच दिवस जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवापूर,वसोली, आंजिवडे,उपवडे, दुकानवाड, या गावांमध्ये जाण्याचे मार्ग पूर्णतः बंद झाले आहेत. चार फुलांवर गेले पाच दिवस पाणी भरलेले असल्याने गावाच्या बाहेर अत्यावश्यक सेवेसाठी ही येता येत नाही एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव आंबेरी नदीवर बांधण्यात आलेला पुल अर्धवटच असल्याने वाहतूक सुरु झाली नाही आणि त्यामुळे वाडोस, गोठोस,आंबेरी, केरवडे, पुळास, नेरुर, गावांना पोचण्यासाठी कुडाळ मार्गे मोठा फेरा घालून जाण्याची वेळ आली आहे.रुग्णांना सुद्धा उपचार मिळेनासे झाले आहेत.

माणगाव खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे माणगाव पंचक्रोशीतील सर्वच भागात पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव खोऱ्यात आज गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता.माणगाव परिसरातील साळगाव हा मार्ग रस्त्यावर पाणी साचल्याने बंदच होता.तर आकेरी रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक खोळंबली होती.माणगाव धरणंवाडी येथील चंद्रकांत सावंत यांचे घराला पावसाच्या पाण्याने वेडा दिल्याने सावंत कुटुंबीयांची गैरसोय झाली .माणगाव बाजार आणि तीठयावरील बऱ्याच दुकानामध्ये पाणी शिरल्याने दुकानाचे नुकसान झाले. आंबेरी पुलावर पाणी आल्याने लोकांची गैरसोय झाली .सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पुलावरून वाहतूक चालू करण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे माणगाव खोऱ्यात वस्तीच्या सर्व एसटी बसेस माणगाव बेनवाडी येथे अडकून पडल्या त्यामुळे माणगाव खोऱ्यातील सुमारे वीस पंचवीस गावातील लोकांची गैरसोय झाली .नवीन बांधलेल्या पुलासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ऐन पावसाळ्यात नवीन पुलावरून वाहतूक चालू करण्यास संबधित विभागाने मज्जाव केल्यामुळे माणगाव खोरे वासियानी नाराजी व्यक्त केली आहे.










