अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना निलेश राणेंच्या माध्यमातून आर्थिक मदत
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीमुळे नुकसान झाले. वायरी येथील सुरेखा मयेकर, कृष्णा गोसावी, गणेश परब यांच्या घराचे नुकसान झाले होते. भाजपा नेते मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्यावतीने देण्यात आलेली आर्थिक मदत भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांना सुपूर्द केली. शासन स्तरावरूनही लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, वायरी माजी सरपंच भाई ढोके, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राहुल नरे, प्रतिक लुडबे, ओंकार लुडबे, शैलेश लुडबे, सागर मायबा, यश देसाई, सुयश मायनाक, कुणाल नाईक, प्रतिक वाघ, नारायण लुडबे, राहुल तळगावकर आदी उपस्थित होते.












