मसुरे | झुंजार पेडणेकर ग्रामपंचायत गोळवण -कुमामे -डिकवल येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळ संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गाव गोळवण येथे सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन शनिवारी दीपप्रज्वलन व गणेशवंदना करून संपन्न झाले. उद्घाटन समारंभ वेळी ग्रामपंचायत गोळवण -कुमामे – डिकवल चे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रामपंचायत अधिकारी सौ. प्रियंका मनवर, ग्रामपंचायत सदस्य श्री. साबाजी गावडे तसेच भंडारी कॉलेजचे प्राध्यापक श्री. प्रा. लेफ्टनंट एम. आर खोत, कट्टा पंचक्रोशी प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुनिल नाईक, संचालिका स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटी कट्टा च्या सौ. श्रद्धा नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य श्री. ध्वजेंद मिराशी, U.M-NSS जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद तसेच डॉ दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी, सारा ऍग्रोफार्मचे मालक श्री. सुरेश सावंत , श्री. प्रभाकर साटम, चेअरमन श्री. अजयराज वराडकर, माजी सेंनिक श्री. सत्यविजय पालव, श्री. निनाद धरपावर, श्री. नंदू नाईक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.











