मसुरे | झुंजार पेडणेकर
ओसरगाव नं. १ शाळा येथे राजे प्रतिष्ठान सिंधू आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांब, धनुर्विद्या व लाठीकाठी या पारंपरिक खेळांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रसेन पाताडे (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी) यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मिता नलावडे (कार्यक्रम अधिकारी), विलास परब (अध्यक्ष, माजी विद्यार्थी समिती), बबली राणे (माजी सरपंच), जीवबा अपराज, नयन आलव, किशोर तांबे, बाळकृष्ण कावले (CISF निवृत्त अधिकारी) तसेच विवेक परब (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठान सिंधू) किशोर कदम मुख्याध्यापक हे मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम राबवत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जात आहे. अशा प्रेरणादायी नेतृत्वामुळेच या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन शक्य झाले, असे मत विवेक परब चंद्रसेन पाताडे या मान्यवरांनी व्यक्त केले.
राजे प्रतिष्ठान सिंधू ही संस्था विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेमार्फत केले जात आहे. असे मत वकील विलास परब, किशोर कदम,बबली राणे यांनी व्यक्त केले
कार्यशाळेत Indian Archery / Recovery Archery चे प्रात्यक्षिक निहार चव्हाण, रंजना चव्हाण व सृष्टी चव्हाण यांनी सादर केले. लाठीकाठी प्रात्यक्षिक दुर्वा चव्हाण, वेद चव्हाण, निहार चव्हाण, रंजना चव्हाण, सृष्टी चव्हाण व सोहम चव्हाण यांनी प्रभावीपणे दाखवले.
रोप मल्लखांब प्रात्यक्षिकात विविध योगासने तर पोल मल्लखांबमध्ये बजरंगी, बगली कात्री व टीम पिरॅमिड मल्लखांब विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विश्वास परब, जगन्नाथ मोडक,गौरेध शिरोडकर, देवानंद राणे, विवेक परब,उमेश परब,सचीन परब, आशिष मोडक संतोष मोडक,केशव मोडक,मनोज पारकर, योगेश्वर मोडक,वैभव मोडक, विनय परब,केशव,रुपल परब,,प्रिया परब,दर्शना शिरोडकर,दिपश्री राणे, प्रदिप मेस्त्री गौरव मोडक,चेतन मोडक,विनय मोडक,उदय मोडक,यश परब, सुनील सावंत,गीतेश लाड मयुरेश मोडक, प्राजक्ता परब, प्रणिता मोडक,प्रीती मोडक,अपर्णा मोडक, यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी केले. प्रास्ताविक विवेक परब यांनी मांडले, तर आभार शीतल दळवी व राजश्री तांबे यांनी मानले












