मंडणगड प्रतिनिधी : कोकणस्थ परिवार, पुणे यांच्यावतीने 15 जानेवारी 2026 रोजी राज्य क्रीडा दिनाचे निमित्ताने पंडित नेहरु स्टेडियम, पुणे येथे आयोजीत कार्यक्रमात राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडाळे यांचा खास सत्कार ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळासाहेब साने यांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते, ऋषिकेश राजमाने यांनी स्वागत केले आनंद पवार यांनी प्रास्ताविक केले अक्षय पवळ यांनी आभार मानले दशरथ पवार यांनी कार्यक्रमाचे सु संचलन केले समारंभास पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटना, अद्वैत परिवार, क्रीडा कट्टा, क्रीडमहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठान, कोकणस्थ परिवार आदी संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो ओळी
राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडाळे यांचा सत्कार करताना कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.












