साळशी हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी श्रेया धुळप यांची निवड

माध्यमिक विद्यामंदिर साळशीच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना

शिरगाव (प्रतिनिधी):    देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशीच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी श्रेया धुळप यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रदीप घाडी, सचिवपदी मुख्याध्यापक संजय मराठे, तर कोषाध्यक्षपदी निलेश लाड यांची निवड झाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार माजी विद्यार्थी संघाच्या निवडीसाठी माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत पालक प्रतिनिधी म्हणून संतोष सावंत, सदस्यपदी संदीप वरेरकर व सिद्धेश भोगले यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम, तर सेवानिवृत्त शिक्षक म्हणून विजय गावकर यांची निवड करण्यात आली.