जि. प. निवडणुकीत बांद्यात भाजपचे कमळ फुलले

प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड 

बांदा : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील महत्वपूर्ण बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी घडामोड झाली असून भाजपचे उमेदवार प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले आहेत. बांदा शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत पांगम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बांद्यात भाजपचे कमळ फुलले आहे.

 

बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रमोद कामत यांचा विजय निश्चित मानण्यात येत होता. बांदा शहर विकास आघाडी स्थापन करून सुशांत पांगम यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र प्रमोद कामत यांची संपूर्ण मतदारसंघात असलेली पकड पाहता त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत होता. त्यामुळेच आज सुशांत पांगम यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊन प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला तुजोरा दिला आहे. प्रमोद कामत यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.