जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांचा विश्वास
बांद्यात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
बांदा l प्रतिनिधी : बांदा पंचायत समितीच्या भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार सौ. रुपाली शिरसाट यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊन जिल्हा परिषद व आठही पंचायत समितीत भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येऊ दे, असे श्री चरणी साकडे घालण्यात आले.
यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद बिनविरोध सदस्य माजी सभापती प्रमोद कामत, भाजपच्या पंचायत समिती उमेदवार रूपाली शिरसाट, माजी सभापती शितल राऊळ, शामकांत काणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, जावेद खतिब, तोरसे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, शिवसेना विभागप्रमुख भैय्या गोवेकर, बांदा माजी सरपंच अशोक सावंत, दीपक सावंत, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, माजी सरपंच जयेश सावंत, देवस्थान समिती अध्यक्ष बाळू सावंत, बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, माजी सदस्य हुसेन मकानदार, दादू कविटकर, सिद्धेश पावसकर, रत्नाकर आगलावे, शैलेश केसरकर, निलेश देसाई, सिद्धेश महाजन, अक्षय मयेकर, साई सावंत, सुनिल धामापुरकर, सुधीर शिरसाट, प्रवीण नाटेकर, संदीप बांदेकर, गुरूदत्त कल्याणकर, केदार कणबर्गी, दर्पण आळवे, मनोज कल्याणकर, निलेश कदम, राजेश विर्नोडकर, भाऊ वाळके, श्रीधर सावंत, बाळा आकेरकर, कैलास गवस, उदय येडवे, समीर सावंत, विशांत पांगम, समीर कल्याणकर, सौ. पेडणेकर, सत्यनारायण गवस आदींसह भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप शिवसेना महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील व जिल्हा परिषद आणि अटही पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वास यावेळी सौ. श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला.













