रत्नागिरी :
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे सक्रिय सदस्य रोटे. डॉ. संदीप सखाराम करे यांना 67व्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये त्यांनी 2025-26 सालात केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी Avenues of Service – Club Service Award तसेच गतवर्षीच्या कार्यकाळासाठी Best Secretary Award (Year 2024–25) या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
रोटरी इंटरनॅशनल कडून दिला जाणारा Avenues of Service – Club Service Award हा रोटरी इंटरनॅशनल तर्फे क्लब स्तरावरील उत्कृष्ट सेवा, नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण सहभाग, प्रभावी क्लब प्रशासन, उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि सदस्यसंवाद यासाठी प्रदान केला जातो. डॉ. संदीप करे यांच्या कार्यपद्धतीमुळे क्लबची कार्यक्षमता वाढली असून जिल्हा पातळीवर क्लबची सकारात्मक ओळख निर्माण झाली आहे.
तसेच Best Secretary Award 2024–25 हा पुरस्कार क्लबचे सचिव म्हणून त्यांनी केलेल्या शिस्तबद्ध प्रशासन, वेळेवर व प्रभावी संवाद, प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी आणि क्लब व जिल्हा यांच्यातील उत्कृष्ट समन्वय यासाठी देण्यात आला.
रोटे. डॉ. संदीप करे यांनी हा सन्मान रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याला समर्पित केला आहे.
हा दुहेरी सन्मान डॉ. संदीप करे यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाबरोबरच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनसाठी अभिमानास्पद असून क्लबमधील संघभावना, कार्यक्षमता आणि सेवाभाव याचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.











