दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्यावतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दापोली | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या वतीने दापोली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आदरणीय गोपाळकृष्ण सोहोनी विद्यालय, दापोली येथे होणार आहे.

सदर स्पर्धा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेचे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित असून बालपण, स्वराज्यनिर्मितीचे महत्त्व, मुत्सद्देगिरी व नेतृत्वगुण तसेच युवकांचे प्रेरणास्थान अशा विषयांचा समावेश आहे. स्पर्धेचे माध्यम मराठी असून प्रत्येक गटासाठी आकर्षक चषक व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या वक्तृत्व स्पर्धेस दापोली तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष श्री. निकेत मेहता, सचिव श्री. मयुरेश शेठ तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रा. तेजस मेहता (प्रकल्प संचालक)
-8796282337,
श्री. स्वप्नील मेहता
-9960199046,
सी.ए. ऋषिकेश शेठ
-7588856464
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संघटने तर्फे करण्यात आले आहे.