गुहागरात 3.30 वाजेपर्यंत 50.24 टक्के मतदान

गुहागर | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिसाठी गुहागरात आतापर्यंत 50.24 मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिली.
सायंकाळी 3.30 वाजेपर्यंत गुहागर तालुक्यात 48 हजार 647 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.यामध्ये 21 हजार 581 पुरुष तर 27 हजार 66 स्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.