लांजा Breaking : लांजा तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना

दुपारी १.३० पर्यंत अवघ्या ३९ टक्के इतक्या मतदानाची नोंद, मतदारांचा निरुत्साह

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यात पुनस, उपळे, सालपे सह अन्य ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत.‌ तर दुपारपर्यंत मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह नसल्याने अवघे ३९ टक्के इतके मतदान झाले होते.

शनिवारी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला.‌ त्यामुळेच सकाळ सत्रात १२.७६ टक्के , सकाळी साडेअकरा पर्यंत २७.५७ टक्के त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत अवघे ३९.८४ % इतक्या अत्यल्प मतदानाची टक्केवारी होती. त्यामुळे मतदान करण्यासाठी मतदार‌ फारसा उत्साहीत नसल्याचे दिसून आले.‌ त्यात पुनस सह अनेक ठिकाणी मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन) बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटल्याचे चित्र दिसून आले.

. तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र या मतदान करण्यासाठी सर्वच ठिकाणी मतदारांचा फारसा उत्साह नसल्याचे चित्र दिसून आले.‌ अनेक मतदान केंद्रांवर मतदारांचा शुकशुकाट जाणवला.

दुपारी १.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी –
आसगे जिल्हा परिषद गट 39.60%, भांबेड जि प गट 39.53%, साटवली जि प गट 39.14%, आणि गवाणे जि प गट 40.96% याप्रमाणे मतदान झाले होते .