दापोली Election update : दापोलीतील निवडणूक निकाल

दापोली | रुपेश वाईकर

योगेश कदम यांचे वर्चस्व; पण विरोधकांचे दोन धक्के

जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये एकूण 16 जागांवरती शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत तर दोन ठिकाणी विरोधकांनी खात उघडले आहे

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात विरोधकांचे दोन धक्के अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या पंचायत समिती गणाचे उमेदवार तुळसा जाधव या विजयी तर जालगाव पंचायत समिती गणातून भाजपाचे श्रीराम इदाते विजयी


हर्णे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या तुळसा जाधव 399 मतांनी विजयी

जालगाव पंचायत समिती गणातील चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे श्रीराम इदाते अखेर विजयी


जालगांव पंचायत समिती गणातून भाजपचे एकमेव उमेदवार श्रीराम इदाते 180 मतांनी पुढे

हर्णे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या तुळसा जाधव आघाडीवर


8वी फेरी अखेर शिवसेनेचे 17 उमेदवार आघाडीवर, जालगांव पंचायत समितीचे भाजपचे एकमेव उमेदवार श्रीराम इदाते आघाडीवर


जिल्हा परिषदेच्या सहा गटात शिंदेंची शिवसेना आघाडीवर पंचायत समितीच्या बाराखड्यांमध्ये 11 जागांवरती शिंदेंची शिवसेना आघाडीवर तर पंचायत समितीच्या जालगाव एका जागेवर भाजपाचा उमेदवार आघाडीवर


दाभोळ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या साधना मिहीर महाजन आघाडीवर

पालगड पंचायत समिती गटातून शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र फणसे पवार 500 मतांनी आघाडीवर


जालगांव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे किशोर देसाई चौथ्या फेरी अखेर हजार मताच्या आघाडीवर

केळशी पंचायत समिती गटातून शिवसेना शिंदे गटातून संदीप चिखले तर जुईकर मोहल्ला येथुन उन्मेश राजे आघाडीवर



दापोली Election update :
* तीन केळशी जिल्हा परिषद गटातून नितीन दुर्गवले शिवसेनेचे आघाडीवर

हरणे जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या ऐश्वर्या धाडवे आघाडीवर

पंचायत समिती जुईकर मोहल्ला शिवसेनेचे उमेश राजे आघाडीवर


दापोली टपाली मतमोजणी अंतिम टप्प्यात

आपले मतमोजणीनंतर होणार ईव्हीएम मशीनचे मोजणी