देवगड तालुक्यात महायुतीला घवघवीत यश जिल्हा परिषदेच्या सर्व जागा विजयी, तर पंचायत समितीच्या सात जागांवर विजय 

देवगड तालुक्यात महायुतीला घवघवीत यश जिल्हा परिषदेच्या सर्व जागा विजयी, तर पंचायत समितीच्या सात जागांवर विजय

देवगड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपा–शिवसेना महायुती विजयी ठरली आहे. बहुतांश मतदार संघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.

या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) एक जागा वगळता सर्व ठिकाणी पराभूत झाली. एकूण निकाल महायुतीच्या बाजूनेच लागला.

भाजपने जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या मतदार संघांमध्ये आपले वर्चस्व कायम राखले. ग्रामीण भागात भाजपच्या उमेदवारांना मिळालेला पाठिंबा आणि मताधिक्य हे महायुतीच्या ताकदीचे द्योतक ठरले.

शिवसेना पक्षालाही महायुतीच्या माध्यमातून यश मिळाले असून दोन्ही पक्षांच्या समन्वयामुळे तालुक्यात सत्तास्थान मजबूत झाले आहे. उबाठा पक्षाचा कोठेच प्रभाव दिसला नाही

एकूणच, देवगड तालुक्यात भाजपा–शिवसेना महायुतीचा स्पष्ट विजय झाला असून स्थानिक राजकारणात महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे या निकालातून स्पष्ट होते.

 

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

 

 

देवगड तालुका – जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल

 

जिल्हा परिषद मतदार संघ : १२ पुरळ (सर्वसाधारण)

 

विजयी उमेदवार : संजय नामदेव बोंबडी

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 4468

 

सुनिल दत्ताराम तेली – शिवसेना (उबाठा) – 2708

 

नोटा : 82

एकूण मते : 7258

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : २३ पुरळ (ना.मा.प्र महिला)

 

विजयी उमेदवार : संजना सत्यवान आळवे

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 2395

 

सानवी सुधाकर तिर्लोटकर – शिवसेना (उबाठा) – 1232

 

नोटा : 71

एकूण मते : 3698

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : २४ तिर्लोट (सर्वसाधारण)

 

विजयी उमेदवार : रविंद्र राजाराम तिर्लोटकर

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 1958

 

सुनिल गणपत तिलोंटकर – शिवसेना (उबाठा) – 1538

 

नोटा : 64

एकूण मते : 3560

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : २८ मणचे (सर्वसाधारण)

 

विजयी उमेदवार : विष्णू बाबाजी घाडी

पक्ष : शिवसेना (उबाठा)

मिळालेली मते : 1734

 

विलास मधुकर साळसकर – शिवसेना – 1632

 

नोटा : 53

एकूण मते : 3419

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : २९ पोंभुर्ले (ना.मा.प्र)

 

विजयी उमेदवार : सादीक जैनुद्दीन डोंगरकर

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 1912

 

व्यंकटेश जगन्नाथ नर – शिवसेना (उबाठा) – 813

 

नोटा : 50

एकूण मते : 2775

 

 

 

जिल्हा परिषद मतदार संघ : १६ शिरगांव (अनुसूचित जाती)

 

विजयी उमेदवार : देवदत्त दामोदर कदम

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 3981

 

अभिषेक वसंत कदम – शिवसेना (उबाठा) – 1386

रंजन सदानंद शिरगांवकर – मनसे – 242

प्रणय मनोहर चांदोस्कर – अपक्ष – 90

मंगेश धर्मराज जाधव – वंचित बहुजन आघाडी – 85

 

नोटा : 114

एकूण मते : 5905

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : ३२ तळवडे (अनुसूचित जाती महिला)

 

विजयी उमेदवार : सलोनी संतोष तळवडेकर

पक्ष : शिवसेना

मिळालेली मते : 2208

 

मयुरी मंगेश जाधव – काँग्रेस – 575

 

नोटा : 142

एकूण मते : 2925

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : ३३ किंजवडे (सर्वसाधारण महिला)

 

विजयी उमेदवार : स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 2752

 

निकीता नारायण दाभोळकर – मनसे – 851

 

नोटा : 82

एकूण मते : 3685

 

 

 

जिल्हा परिषद मतदार संघ : १८ कुणकेश्वर (ना.मा.प्र)

 

विजयी उमेदवार : सुनिल बाळकृष्ण पारकर

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 4929

 

गणेश जगदीश गांवकर – शिवसेना (उबाठा) – 2291

 

नोटा : 138

एकूण मते : 7358

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : ३५ मुणगे (सर्वसाधारण)

 

विजयी उमेदवार : सदाशिव पुरुषोत्तम ओगले

पक्ष : भाजप

मिळालेली मते : 2841

 

दीपक नारायण कदम – शिवसेना (उबाठा) – 859

 

नोटा : 90

एकूण मते : 3790

 

 

 

 

पंचायत समिती मतदार संघ : ३६ कुणकेश्वर (सर्वसाधारण)

 

विजयी उमेदवार : अमोल विजय लोके

पक्ष : शिवसेना

मिळालेली मते : 2019

 

गणेश गोपाळ वाळके – शिवसेना (उबाठा) – 1460

 

नोटा : 89

एकूण मते : 3568


२९ पोंभुर्ले पंचायत समिती मतदारसंघातून सादिक जैनुद्दीन डोंगरकर यांचा विजय

देवगड : प्रतिनिधी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील २९ पोंभुर्ले (ना.मा.प्र) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सादिक जैनुद्दीन डोंगरकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा)चे उमेदवार व्यंकटेश जगन्नाथ नर यांचा पराभव केला.

निकाल जाहीर होताच पोंभुर्ले परिसरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी आनंद व्यक्त केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

सादिक जैनुद्दीन डोंगरकर यांनी या विजयाचे श्रेय मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला दिले. मतदारसंघातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


कुणकेश्वर पंचायत समिती मतदारसंघातून सुनील उर्फ भाई पारकर यांचा विजय

 

देवगड : प्रतिनिधी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील १८ कुणकेश्वर (ना.मा.प्र) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील उर्फ भाई पारकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा)चे उमेदवार गणेश जगदीश गांवकर यांचा पराभव केला.

निवडणूक निकाल जाहीर होताच कुणकेश्वर परिसरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी आनंद व्यक्त केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष करण्यात आला.

सुनील उर्फ भाई पारकर यांनी या विजयाचे श्रेय मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला दिले. मतदारसंघातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


३६ कुणकेश्वर पंचायत समिती मतदारसंघातून अमोल विजय लोके यांचा विजय

देवगड : प्रतिनिधी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील ३६ कुणकेश्वर (सर्वसाधारण) मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल विजय लोके यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा)चे उमेदवार गणेश गोपाळ वाळके यांचा पराभव केला.

निकाल जाहीर होताच कुणकेश्वर परिसरात शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

अमोल विजय लोके यांनी या विजयाचे श्रेय मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि पक्ष नेतृत्वाला दिले. मतदारसंघातील विकासकामे, पर्यटन विकास तसेच स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


३५ मुणगे पंचायत समिती मतदारसंघातून सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांचा विजय

देवगड : प्रतिनिधी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील ३५ मुणगे (सर्वसाधारण) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा)चे उमेदवार दीपक नारायण कदम यांचा पराभव केला.

निवडणूक निकाल जाहीर होताच मुणगे परिसरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांनी या विजयाचे श्रेय मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला दिले. मतदारसंघातील पायाभूत सुविधा, स्थानिक विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


तळवडे पंचायत समिती मतदारसंघातून सलोनी संतोष तळवडेकर यांचा विजय

 

देवगड : प्रतिनिधी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील ३२ तळवडे (अनुसूचित जाती महिला) मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार सलोनी संतोष तळवडेकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार मयुरी मंगेश जाधव यांचा पराभव करत मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली.

निकाल जाहीर होताच तळवडे परिसरात शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांनी आनंद व्यक्त केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला

सलोनी संतोष तळवडेकर यांनी या विजयाचे श्रेय मतदार, कार्यकर्ते व पक्ष नेतृत्वाला दिले. मतदारसंघातील महिला, अनुसूचित जाती घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून देवदत्त दामोदर कदम यांचा विजय

 

देवगड : प्रतिनिधी

 

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत १६ शिरगाव (अनुसूचित जाती) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवदत्त दामोदर कदम यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकावला.

 

निवडणूक निकाल जाहीर होताच शिरगाव परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

 

देवदत्त दामोदर कदम यांनी मिळालेल्या विजयाचे श्रेय मतदार, कार्यकर्ते आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला दिले. शिरगाव मतदारसंघातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

या विजयामुळे शिरगाव मतदारसंघात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


देवगड मध्ये भाजपा निर्विवाद, पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा

२३ पुरळ (ना.मा.प्र महिला)

 

संजना सत्यवान आळवे – भाजप 2395 (विजयी)

 

सानवी सुधाकर तिर्लोटकर – शिवसेना (उबाठा) 1232

 

२४ तिर्लोट (सर्वसाधारण)

 

रविंद्र राजाराम तिर्लोटकर – भाजप 1958

 

सुनिल गणपत तिलोंटकर – शिवसेना (उबाठा) 1538